अमेरिका आणि मित्रराष्ट्राचं लष्कर परत गेल्यास अफगाणिस्तानात काय होईल, याची काळजी सर्वाना वाटते. तालिबान परत एकदा सत्ता काबीज करणार की तालिबानातील उदारमतवाद्यांना सत्तेत सहभागी करून घेणार? अशाश्वतेच्या फेऱ्यात सापडलेली तेथील माणसं..
भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते आणि क्रिकेटपटूंना देव. क्रिकेट हा खेळ देशवासीयांच्या नसानसांत भिनला आहे. आज सर्वत्र क्रिकेटचा बोलबाला असला तरी काही वर्षांपूर्वी क्रिकेटसाठी पोषक वातावरण नव्हते, पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली.
दिल्लीत येणं-जाणं सुरू झाल्यापासून खूपदा मनात येऊन गेलं होतं की अटलजींच्या बरोबर सावलीसारखे वावरणारे आणि आपल्या गालभर मिशांमुळे नेहमी नजरेत भरणारे अटलजींना समर्पित होऊन वावरलेले कार्यकर्ते शिवकुमार यांच्याशी एकदा गप्पा मारायच्या, जमलं तर त्यांची मुलाखत घ्यायची.
तुम्ही दोघे आणि दोघांचे पक्ष आणि संघटना एकत्र येणार का नाही, बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्कवर होणार की नाही याचीही चर्चा मला करायची नाही. तुम्ही एकत्र आलात किंवा वेगळेच राहिलात किंवा आघाडी केलीत तरी आणि बाळासाहेबांचं स्मारक कुठेही झालं,
आजमितीस भारत आपली ८० टक्के ऊर्जेची गरज कोळसा आणि नसíगक वायू या स्रोतांतून भागवत आहे. ही जीवाश्म इंधनसंपदा संपणारी तर आहेच पण त्याच्या वापराने पृथ्वीस हानीकारक अशा हरितगृह वायूंची निर्मिती होते. अणुऊर्जा निर्माण करून बरीचशी गरज भागवावी असा एक विचारप्रवाह आहे. पण त्याला जपानमध्ये सुनामीनंतर आलेल्या संकटामुळे विरोध वाढत आहे.
बारामती येथे येत्या आठवडय़ात होत असलेल्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची मातृसंस्था म्हणविणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात तसा व्यवहार न करणाऱ्या नाटय़ परिषदेच्या दृष्टिकोनात गेल्या दोन वर्षांपासून काही सकारात्मक बदल होत आहेत. त्यांचा परामर्श घेणारा लेख..
आरक्षणाने गुणवत्तेचे कसे ‘मातेरे’ होते, हा युक्तिवाद आरक्षणाच्या विरोधकांकडून नेहमीच होतो. हा युक्तिवाद करताना विरोधकांचा रोख बरेचदा वैद्यकीय शिक्षणाकडे असतो. या व्यवस्थेमुळे डॉक्टरकीचा दर्जा कसा खालावणार आहे वगैरे मुद्दे उपस्थित केले जातात. पण, सरकारी महाविद्यालयांमधील आरक्षित जागांवरील आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये किती तफावत असते याचा एकदा अभ्यास व्हायला हवा.
हल्लीच्या नृत्यस्पर्धाच्या लाटेत आचार्य पार्वतीकुमार हे नाव खूपच प्राचीन वाटलं म्हणूनच त्यांच्याविषयी कुतूहल जागृत झालं. एके दिवशी सकाळीच त्यांचं घर शोधत ग्रँट रोड इथल्या घराची बेल वाजवली. नृत्यातला ‘ग’ सुद्धा माहीत नसलेला मी, आरदयुक्त भीतीनं माझ्या येण्याचं प्रयोजन सांगताक्षणी कोणतेही आढेवेढे न घेता ओळखीच्या शिष्याशी बोलल्याप्रमाणे ते माझ्याशी गप्पा मारत भूतकाळात रमून गेले.
मी दुसरी-तिसरीत असतानाची गोष्ट. शाळेत आम्हाला बाईंनी निबंध लिहायला दिला होता. विषय होता ‘माझे बाबा’. मी आपलं माझ्या वयाला साजेसं असं ‘बाबा लाड करतात, खेळतात’ वगरे लिहिलं. त्यात एक वाक्य असं लिहिलं होतं की ‘माझे बाबा व्हायोलिनपण वाजवतात.’ आमच्या बाई संगीताच्या जाणकार होत्या. त्यांनी मला ‘समज’ दिली. तेव्हा मला पहिल्यांदा पंडित डी. के. दातार हे ‘माझे बाबा’ आहेत आणि संगीताच्या, विशेषत: व्हायोलिनच्या दुनियेत ‘बाप’ कलाकार आहेत, याची जाणीव झाली.
रामलीला मैदानावरील गेल्या वर्षीच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर देशभरात प्रचंड मोठी संतापाची लाट उठली. ही लाट इतर कोणत्याही ठिकाणी फुटण्याऐवजी ती सोशल नेटवर्किंग साइट्सवर जास्त प्रमाणात फुटली.
यंदा डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा दक्षिण भारतात झाला. डेंग्यूच्या मृतांची आकडेवारी बघितली तर त्यात तामिळनाडूत ६० आणि त्याखालोखाल महाराष्ट्रात ५९ लोक दगावले आहेत. डेंग्यूचे प्रमाण वाढण्यात ‘आशियन टायगर’ या डासाच्या नवीन जातीचा मोठा वाटा असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दुग्धोत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात सहावा, तर दूधसेवनात मात्र १६ वा आहे. देशात सर्वाधिक दुग्धोत्पादन उत्तर प्रदेशात २१ हजार टनांहून अधिक होते. देशात एक लाख १० हजार टनांहून अधिक दुधाची भुकटी शिल्लक असून मागणी खूपच कमी आहे.
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना तर ‘तन्वीर नाटय़धर्मी’ पुरस्कार प्रदीप वैद्य यांना जाहीर झाला असून आज, रविवारी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. त्यानिमित्त..
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या स्थापनेला विरोध करताना सतीश आळेकर यांनी म्हटले होते की पीडीए, कलोपासक, थिएटर अकादमी यांसारख्या नाटय़संस्थांमध्ये रंगकर्मी जसे काही ना काही करीत शिकत जातात आणि रंगभूमीची त्यांना पूर्ण ओळख होते तसे औपचारिक शिक्षणाने होणार नाही.
अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच ‘शिक्षण’ ही सहा ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची मूलभूत गरज आहे, यावर २००९च्या शिक्षण हक्क कायद्याने शिक्कामोर्तब केले. हा कायदा अस्तित्वात आल्यापासून यात बऱ्याच सुधारणा झाल्या, भविष्यात होत राहतील. पण, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या मुलांना न्याय देण्यात किंवा जे या प्रवाहात आधीपासून आहेत त्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षणाअभावी सुरू असलेले ‘गटांगळ्या’ घेणे थांबले आहे का, याचा विचार होणे आवश्यक आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात देशांतर्गत समस्या, आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांबरोबरच, अगदी व्यक्तिगत जीवनाचे अनेक पदरही पारदर्शकपणे उलगडले. २०१४ ची निवडणूक लढवायची नाही आणि राज्यसभेवरदेखील जायची इच्छा नाही, हेही त्यांनी जाहीर करून टाकले.
एकाला कायदा उधळून लावायचा आहे तर दुसऱ्याला कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या या जोरकस प्रयत्नात हे गाव मात्र पूर्णपणे उधळले गेले आहे. छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मरकेगावची वेगळीच कहाणी..
आजच्या अतिभोगवादी आणि अतिटोकाच्या व्यावहारिक जगात माणुसकीचा गहिवर असणारा, सत्तेच्या बाजारात मानवी चेहरा आणि मन जपणारा राज्यकर्ता माणूस भेटणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात हे गुण होते. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्याच एका अनुयायाचा विशेष लेख..
उठता-बसता समाजसुधारकांच्या नावाची जपमाळ ओढणाऱ्या महाराष्ट्राच्या विधिमंडळासमोर जादूटोणाविरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा आणि मंजुरी यासाठी कार्यक्रम पत्रिकेवर आहे. या कायद्याची १८ वर्षांची वाटचाल, अंधश्रद्धा निर्मूलनापलीकडे जाणारे त्याचे वैचारिक तसेच लोकशाहीतील महत्त्व याबाबत या प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेला ऊहापोह..
काही दिवसांपूर्वी ऊसदरासाठी कोल्हापूर, सांगली परिसरांत झालेले आंदोलन तूर्तास थांबले असले तरी शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेली विशेष मुलाखत..
राज्याच्या माजी शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या आठवणी याविषयीच्या लेखांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या पुस्तकातील हा लेख..
स्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे.. गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असं हा कायदा सांगतो, तरीही महाराष्ट्रच काय, देशभरातली अगदी मोजकी गावं अशा नोंदी ठेवतात..
पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे.. महाराष्ट्रातील नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी!
भूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा कर्करोग बेमालूमपणे आपल्याला विळखा टाकतो आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील दौंड तालुक्यातील कुरकुंभ गाव आणि तिथे असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) क्षेत्र प्रसिद्ध आहे. तिथे अनेक मोठय़ा कंपन्या आहे, विशेष म्हणजे त्यात रासायनिक कंपन्यांचासुद्धा समावेश आहे.
हवामानबदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’ यांचा धोका आहे की नाही, यावरले वाद केवळ निष्फळ नव्हे तर अयोग्यही ठरावेत, इतके हे संकट स्पष्ट झाल्याचे मत सध्या सुरू असलेल्या दोहा शिखर बैठकीत व्यक्त झाले.. गरीब आणि श्रीमंत देश यांच्यातील मतलबी मतभेद कदाचित इथेही कायम राहतील, पण जो धोका दिसतो आहे, तो नाकारण्यात अर्थ नाही..
गुच्छ म्हणजे वैविध्य.. खुडलेल्या निरनिराळय़ा फुलांना एकत्र आणणं.. विविधतेतलं सौंदर्य! खाण्यापिण्याच्या सवयींत, जगण्यात हे वैविध्य आपण बाणवलं.. पण देशी निसर्ग जपायला हवा, याचं भान सुटत गेलं..
ही जनावरे दिवसाला फारतर दीड ते दोन लिटर दूध देतात! पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.. या वाणांची उपयुक्तता फक्त दूध देण्यापुरती आहे की बदलत्या काळात, संकराचे प्रयोग करणे शक्य आहे, याचा विचार होणे आवश्यकच आहे..
एकीकडे शेतीची तंत्रं बदलली, दुसरीकडे शहरांच्या गरजा वाढल्या. मग अधिक दूध देणारे संकरित वाणच उपयुक्त ठरू लागले.. पण संकरासाठी तर अस्सल देशी वाण टिकवायला हवेत, अशी परिस्थिती आता आली आहे..
ऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी झाला? ‘२०० वर्षांत दोन आठवडय़ानं पुढे’ सरकणाऱ्या पावसाळ्यानं चाल बदललीय का?
गडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे असूनसुद्धा!
नागरी शहर नियोजनातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे चारचाकी वाहनांसाठीचा वाहनतळ.
एक वर्ष संपून दुसरं वर्ष पदार्पणाच्या तयारीत राहतं. त्या नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आपण तयारीला लागतो
हर एक वाद्य घरात कसं ठेवावं, कसं जपावं, याची सुद्धा गरज वेगवेगळी असते. वाद्यानुरूप ती बदलते.
अलीकडेच जुन्या करारांवरील मुद्रांक शुल्काबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला.
स्वस्त आणि जलद तक्रार निवारण हे रेरा कायदा आणि महारेराचे एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ आहे.
गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे
ही जागा घेताना जीवन पाटील या तरणखोप गावात राहणाऱ्या डॉक्टरांच्या घनिष्ठ मित्राची खूप मदत झाली.
सोनारांना शिसे पुरवून त्यांच्याकडून बंदुकीच्या गोळ्या तयार करून घेतल्या.
आधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे स्थान टिकवून आहे.
ज्या वर्षी हे फ्लॅट विकले त्या वेळी फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये होती.
आजवर त्यांनी एकूण रकमेच्या ७०% रक्कम बिल्डरकडे भरून झाली होती व बँकेचे हप्तेही चालू झाले होते.
नूतनीकरण करणं हे अजिबातच सोपं काम नाही. बऱ्याचशा एजन्सीज् या कामात गुंतलेल्या असतात.
अटॅच लॉक्सच्या चाव्या दोन सेटमध्ये करून एक सेट घरात ठेवायचा आणि एक सेट कायम बॅगेत पडू द्यायचा.
घराचा प्रवेशभाग सुनियोजित असायला हवा आणि सभोवताली पटकन व सहजपणे फिरण्यासाठी पुरेशी जागा हवी.
नवीन पनवेल म्हणजेच खांदा कॉलनी येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
मोजक्या आणि नेमक्या सामानात प्रवास कसा करावा, याचे खरे तर क्लासेसच घेतले पाहिजेत या देशात.
आमच्या घरात जेव्हा एखादं कार्य असतं तेव्हा मात्र झोपाळा तेवढय़ापुरता काढून ठेवला जातो.
कायदा करण्यापासून ते कायदा लागू करण्यापर्यंतचे सर्व बाबतीतले सर्वोच्च अधिकार कायदेमंडळाकडे आहेत.
शिवछत्रपतींनी जगाच्याही इतिहासात आगळी ठरावी अशी दुर्गकेंद्रित राज्यपद्धती निर्माण केली.
मालमत्ता खरेदी करताना आणि विकतानादेखील, शक्यतोवर असे कुलमुखत्यारपत्र अवश्य करावे.