भूकंपाच्या बातम्यांत आणखी एक उल्लेख आवर्जून असतो- ‘भूकंप या रिश्टर स्केलचा होता’.
कीटक म्हणजे हालचाल करणारा प्राणी असे समीकरण आपल्या डोक्यात बसलेले असते.
रेरा कायद्यानुसार प्रकल्प नोंदणी करताना, प्रकल्प पूर्ततेची निश्चित तारीख जाहीर करणे बंधनकारक आहे.
आता तर महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्याला तिसरी दुरुस्ती केली आहे.
‘होय, पण ब्लॉग म्हणजे काय ते सांगा.. इंटरनेट सेवेद्वारे स्वत:चा ब्लॉग सुरू करता येतो हे कळलं, पण तो कसा सुरू करावा, याबद्दल या सदरातून मार्गदर्शन मिळाल्यास बरे होईल’ अशा अर्थाच्या दोन ईमेलना उत्तर न दिल्याची रुखरुख वर्ष संपताना आणि अर्थातच या सदराचाही हा ‘विराम-लेख’ लिहिला जात असताना नक्कीच उरलेली आहे.
‘क्लाउडवॉचिंग’ नावाचा एक प्रकार असतो. त्यात हवामानशास्त्र वगैरे अजिबात येऊ न देता, फक्त ढगांच्या आकारांवरून, त्यांच्या संभाव्य घनतेवरून तो आकार कसकसा बदलत जाईल आणि तो ढग कोणत्या प्रकारचा असेल, याचा अंदाज बांधत पाहत राहायचं. अंदाज चुकतात किंवा बरोबर निघतात.
लेखक कुणासमोर तरी काहीतरी ‘सादर’ केल्यासारखा लिहू लागला की, साहित्यगुणांचं नुकसान होतं. हे निरीक्षण लाडक्या, प्रभावशाली, नोबेल विजेत्या वगैरे लेखकांबद्दल खरं ठरतं; तिथं ब्लॉग लेखक/ लेखिकांची काय कथा? अनेकांना याचा राग येऊ शकतो.
तज्ज्ञांचे ब्लॉग समजायला कठीणच असतात असं नाही, आपल्या एरवीच्या जगण्याशी तज्ज्ञ काय सांगू पाहताहेत याचा संबंधच नसतो असंही नाही.. आणि जरी समजायला कठीण असले, तरी ज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी हे ब्लॉग असणं महत्त्वाचं असतं.
पत्रकारांना ब्लॉग राखणं कठीण नाही. त्यातही अनेक पत्रकार केवळ पूर्वप्रकाशित लिखाण ब्लॉगवर कटपेस्ट न करता स्वतंत्र ब्लॉगनोंदी करतात. पत्रकारांचे ब्लॉग लक्षवेधक असणं, हेही व्यवसायानुरूप साहजिक आहे.
त्याचे म्हणजे अनिल गोविलकर यांचे. त्यांच्या ब्लॉगचेही नाव ‘गोविलकरअनिल.ब्लॉग.इन’ असे आहे. ‘वाचनगाणे’ असे या ब्लॉगबद्दल इथे का म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र ‘तद्दन पत्रकारीय क्ऌप्ती’ यापेक्षा निराळंही असू शकेल.
‘आई-मुलांचे मासिक’ अशी एक ओळ ‘चांदोबा’ या मासिकाच्या अनुक्रमणिकेच्या पानावर असायची. पुढे ती गायब झाली. ‘येशीअँडमॉमी’ या नावाचा ब्लॉग हा ‘आई-मुलाचा ब्लॉग’ आहे.
‘राजा हा रयतेचा उपभोगशून्य स्वामी’ हे वाक्य कोणत्याही काळात, कोणत्याही भूमीवरच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावे, असे आहे आणि राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील ‘संभाजी’च्या तोंडी ते वाक्य आहे.
प्रख्यात दिवंगत लेखक भाऊ पाध्ये यांनी समाजाचं निरीक्षण खुलेपणानं आणि समपातळीवरून मांडलं म्हणून ते ‘ब्लॉगरांचे बाप’ ठरतात, असा उल्लेख गेल्या आठवडय़ाच्या ‘वाचावे नेट-के’मध्ये होता. त्यातल्या ‘समपातळी’बद्दल काही विनाकारण गैरसमज होण्याचा संभव आहे.
प्रभाकर फडणीस हे ब्लॉगवर उडत्या गप्पा मारण्यापेक्षा गांभीर्यानं काही लिहू इच्छिणाऱ्या ब्लॉगलेखकांपैकी आहेत. स्वत:बद्दलच्या लेखनापासून लांब राहणं हा त्यांचा स्वभाव दिसतो. काहीतरी वाचून मग लिखाण करणं, अशी त्यांच्या ब्लॉगलेखनाची पद्धत आहे. महाकाव्यं, हल्लीची पुस्तकं किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्या यांपैकी काहीही त्यांना पुरतं.
कोविड-१९ विरोधातील आपली लढाई सुरू आहे. त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम याविरोधातही आपण लढत आहोत.
अन्नधान्य उत्पादनात आपण आता स्वयंपूर्ण झालो आहोत हे खरे.
करोना विषाणूचे आव्हान हे मानवजातीच्या ज्ञात आणि लिखित इतिहासात अभूतपूर्वच आहे
टाळेबंदीच्या काळात गरीब-वंचित तसेच आदिवासींच्या घरातील चूल विझणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल.
जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे जी माहिती दिली आहे, त्यानुसार २०५ देशांत कोविड १९ म्हणजे करोना विषाणू पसरला आहे.
आर्थिक विकास दर मंदावण्याची सुरुवात ही विषाणू येण्याच्या आधीपासून झाली आहे.
कर्जदाराच्या खात्यावर बारीक नजर ठेवणे हे त्या कर्ज देणाऱ्या बँकेसाठी आवश्यक असते.
चीनमध्ये विषाणू पसरल्याच्या घटनेला आता १० आठवडे उलटून गेले आहेत.
हिंसाचार उसळला तेव्हा शंभर पोलीस तेथे उपस्थित होते व त्यांनी त्या परिस्थितीतही कुठलाही प्रतिसाद न देता मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली.
पंतप्रधान ‘राष्ट्रहितासाठी निर्णय’ असे म्हणतात, तेव्हा त्यांची अपेक्षा अशी असे की या निर्णयांवर टीका नको आणि चर्चासुद्धा नको.
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व का महत्त्वाचे आहे, हे समजूनच न घेता त्याची पायमल्ली होते आहे.
भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर या सगळ्याचा दोष जातो.
आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून आश्चर्याचे धक्के आणि अश्रू हेच आपण पाहातो आहोत.
१० ऑक्टोबर २०१९ रोजी न्यायालयात केंद्र सरकारने असे सांगितले की, काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
शतकानुशतके आपल्या देशातील परिस्थिती अशी की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील सर्वाधिक लोक हे तळागाळातील जनता आहेत.
राज्यात ममता बॅनर्जी यांनी भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिले.
आपण पाहिले.. पण तेवढय़ाने आपल्या अर्थव्यवस्थेची ‘अत्यवस्थ’ अवस्था सुधारणार आहे का?
विद्वानांनी तसेच अनेक माजी न्यायमूर्तीनी या विधेयकास घटनाबाह्य, संविधानविरोधी ठरविले आहे.
पण हेच देशाच्या राजकारणातही लागू होते का? एखाद्याने आधी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना चांगले काम केले असेल..
सत्तेच्या वर्तुळात सध्या कशाची चर्चा आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
भारताच्या इतिहासात तरी एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात अजूनपर्यंत रूपांतर करण्यात आले नव्हते.
एकत्वाच्या संकल्पनेला हा एक नवाच पैलू जोडून राज्यांचे अधिकार त्यांनी वाऱ्यावर सोडले..
काकासाहेब गाडगीळांच्या कन्या म्हणून दिल्लीशी सुरेखा पाणंदीकरांचा परिचय जुना, पण या शहरातून त्यांनी सुरू केलेल्या बालग्रंथालय चळवळीची पाळेमुळे आता युनेस्कोपर्यंत पोहोचली आहेत. त्याबद्दल सांगताना साने गुरुजी कथामालेचाही उल्लेख आवर्जून होतोच..
शल्यचिकित्सकाची- सर्जनची बोटे निपुण असावीच लागतात, पण पंतप्रधानांच्याच बोटांवर शस्त्रक्रिया करणे किंवा अंगठा नसलेल्यांना तो जोडणे..
पंडित रविशंकर यांच्यासोबत दहा वर्षे काढण्याचे भाग्य लाभलेले सतारवादक परिमल सदाफळ हे शिक्षणाने एम्.टेक. आहेत आणि कमी खर्चात अक्षय ऊर्जा-साधने गरिबांहाती पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे..
प्रा. अश्विनी देशपांडे म्हणजे प्रसिद्ध नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांच्या कन्या. विद्यार्थिदशेत डॉक्टर होण्याचे एकमेव ध्येय त्यांनी बाळगले होते. मात्र नंतर त्या वळल्या अर्थशास्त्राकडे. सरकारी प्रशासन, उत्तरदायित्व, सामाजिक घटकांवर होणारे परिणाम, जात, धर्म, वंश आणि स्त्री-पुरुष विषमता यांसारखे प्रश्न अर्थकारणाच्या व्यवहारवादी नजरेतून तपासायला त्यांना आवडते..
सर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल न्या. विकास श्रीधर सिरपूरकर यांनी दिले. वरोरा आणि विदर्भावर मनापासून प्रेम असलेल्या सिरपूरकरांच्या रोमारोमांत वैदर्भीय अघळपघळपणा भिनला आहे. वैदर्भीय दिलदारपणा भारतात कुठेही दिसून आला नाही, अशी खंतही त्यांना वाटते.
ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता दाणी-चतुर्वेदी यांना सामाजिक न्यायात महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या भूमिकेचा अर्थ बिहारमध्ये गेल्यावर उमगला. त्यामुळे समाजात किती फरक पडतो, हे लक्षात आले. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारने महाराष्ट्राचे अनुकरण केले तर देश खूप पुढे जाईल, असे त्यांना वाटते.
नॅसकॉमचे अध्यक्ष असताना प्रसिद्धीझोतात आलेले किरण कर्णिक त्याही आधीची चार दशके भारतातील तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचे एक शिल्पकार होते आणि या बदलांचा लोकांवर काय परिणाम होतो, याचे साक्षीदारही. डॉ. विक्रम साराभाईंसारख्यांचा सहवास काळाने संपवला, तरी तंत्रज्ञान लोकोपयोगी कसे ठरेल, याच्या चिंतनाचा वसा कर्णिकांनी सोडलेला नाही..
मोठमोठय़ा पदांमुळेच जिथे माणसे ओळखली जातात त्या शहरात, दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या ‘सामुदायिक विकास समिती’च्या सदस्य, ही शांता वाघ यांची सध्याची ओळख.. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते त्यांचे समाजकार्य आणि त्यामागे असलेल्या तळमळीतून आलेली, गरिबांशी आणि सरकारी/ बिगरसरकारी यंत्रणांशी संवाद साधण्याची त्यांची क्षमता. ही क्षमताच त्यांच्या संघर्षांची ऊर्जा आहे..
मराठी लोक हुशार आहेत, त्यांचे शिक्षण चांगले असते. त्यांनी सनदी सेवेत यायला हवे, देशाची सेवा करायला हवी. तामिळ, मल्याळी कुठेही जाऊन काम करतात. पण आपले लोक कचरतात. त्यांना मुंबई, पुणे आणि कल्याणबाहेर पडायची इच्छा नसते, अशी खंत ४० वर्षे सनदी सेवेत काढलेल्या प्रदीप व शीला भिडे या दाम्पत्याला वाटते..
डॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु ‘सामान्यांप्रमाणेच जगणारा’ असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान! या तंत्रज्ञानासोबतचा त्यांचा प्रवास जाणून घेताना, महाराष्ट्राबाहेरच्या दोन पिढय़ा अखेर ‘महाराष्ट्रवासी’ होण्याचे उपकथानकही उलगडते..
गेल्या पाच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील असा शिवाजी जाधव यांचा लौकिक आहे. महिन्याकाठी सुमारे ५० नवी प्रकरणे त्यांच्याकडे येतात. ३० ज्युनियर्स आणि साहाय्यक यांच्या मदतीने हे आव्हान ते पेलत असतात.
आंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रात तसेच भारतात दुसऱ्या फळीच्या लेखकांमध्ये गणना होणारे मकरंद परांजपे ‘हिंदूस्थानीपणा न सोडता आधुनिक होऊन पाश्चात्त्य वर्चस्वाला प्रत्युत्तर देता येईल’असे संस्कृतीच्या अभ्यासातून म्हणतात, तेव्हा जेएनयूतले हे परांजपे डावे की उजवे ही चर्चा फोल ठरते आणि हा माणूस घडला कसा, याचे कुतूहल वाढते..