१५ ऑगस्ट जर राष्ट्रीय सण आहे तर बाकीचे दिवस काय राष्ट्रीय दुखवटय़ाचे आहेत का? सभ्य नागरिकांना राजरोस लुबाडणारा हा देश आहे की चोरांचा मेळावा?
परीक्षेत असायचं ना. खालीलपैकी कुठल्याही पाच प्रश्नांची उत्तरे लिहा. पुढीलपैकी कुठल्याही एका विषयावर निबंध लिहा. पर्याय निवडण्याचं बाळकडू आपल्याला शालेय जीवनातच पाजलं जातं म्हणायचं..
इंग्लिशमधे ‘फ्रेंड’च्या किती पायऱ्या आहेत नाही? अॅक्वेन्टन्स, कलीग, फास्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, डिस्टंट फ्रेंड.. गंमत वाटते. मला नाही असं मोजता येत. कारण, फ्रेंड इज अ फ्रेंड.
भाऊंच्या-वामनरावांच्या धोतराचा एकदा खोंबारा निघाला होता. तेव्हा त्यांनी श्रुतीताईंकडे धोतराचंच एक सूत मागितलं. आणि जराही कळू नये अशी सुबक शिवण घालून फाटका कोपरा दुरुस्त केला.
आपल्याला नवी गोष्ट कायमच आवडत असते. त्यात ताजेपणा असतो. पण जुन्यामधे एक अवीट गोडी असते.
बहुतेक जुनी वितुष्टं आठवून सूड उगवण्यासाठी आपले पूर्वज डासांचा जन्म घेत असणार. त्याचा सामना करण्यासाठी ‘मॉस्किटो रिपेलंट’ हय़ा नावाखाली बाजारात जे जे काही उपलब्ध आहे...
नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. ‘पावसाळा’ नावाचा काव्यमय ऋतू आता मागे पडत चाललाय. आता ‘सीझन’ बदलतो आणि ‘मॉन्सून’ येतो.
तत्त्व म्हणून स्वीकारलेली गोष्ट अनेकदा आपल्याला भासमान सत्यात ठेवते. तिथे आपण अधांतरी असतो. पाय जमिनीवर हवे असतील, तर आपल्याला सो कॉल्ड तत्त्वांमधली सत्यासत्यता आपणच शांतपणे पडताळून पाहिली पाहिजे.
माझ्या मुलीला अचानक ताप भरला. सासऱ्यांना वांद्रय़ाच्या- जसलोक (?) हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. घराची भिंत कोसळली.. मोठ्ठा अॅक्सिडेंट झाला. शेजारच्या बाईंनी जाळून घेतलं. ओढा आला. कुकरचा स्फोट झाला. नवरा पिऊन आला. त्यांनी मारलं. आमच्याकडे काम करणाऱ्या संगीताच्या घशाला कोरड पडायची. पण तिच्या थापा संपायच्या नाहीत. कामावर आली की घर लख्ख करून जायची. पण आली नाही तर दुसऱ्या दिवशी करमणुकीचा तास ठरलेला.
तिकीट काढावं लागत नाही ना चांगल्या सीटसाठी धडपड.. डोळे मिटले की मनोरंजन सुरू. की ‘मार्ग’दर्शन? निर्माण करण्यावर असते. म्हणूनच डू क्रिएट स्वीट ड्रिम्स..
शुक्रवार हा माझ्यासाठी व्हिवाचा-‘सो.कुल’चा वार असतो. आणि अर्थातच रीलीज होणाऱ्या माझ्या प्रत्येक नव्या सिनेमाचा. पण आजच्यापेक्षा काही मोठं कार्य, आनंदाचा उत्सव असूच शकत नाही. म्हणून आजचा हा २४ मेचा शुक्रवार माझ्या, तुमच्या व्हाईटलीलीचा आहे.
‘विसराळू विनू’ नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली गोष्ट आता आठवत नाही, पण शीर्षक मात्र पक्कं लक्षात आहे. जवळजवळ ‘परफेक्शनिस्ट’ अशी जवळच्या मित्रमंडळींमधे माझी ख्याती आहे. आवडत्या माणसांचे वाढदिवस तर मला तोंडपाठ असतात. सदा-सर्वकाळ मी काहीतरी लक्षात ठेवण्यात बिझी असते.
ख्रिस गेलच्या विक्रमी १७५ धावा आणि इतरही फलंदाज, गोलंदाजांचा आक्रमक खेळ बघता तक्रारीला जागाच नाही. उलट आपणही घरबसल्या क्रिकेटमुळे उत्कंठावर्धक मनोरंजनाचा आस्वाद घेतोय. मला अजूनही तो दिवस आठवतो. जेव्हा मुंबईत ठिकठिकाणी मोठमोठय़ा होर्डिगवर नुसती लाल रंगाची मिरची दिसायला लागली. मग त्याच्याखाली काही अक्षरं उमटली.
‘साखरेचं खाणारे’ हल्लीच्या ‘डाएट’ जमान्यामध्ये मागे पडत चालले आहेत. मात्र चवीनं खाणाऱ्यांची गरज वाढते आहे. चवीबद्दल किती बोलतात ना लोक! म्हणजे बोलूच नये असं नाही. तरी किती बोलावं याला काही मर्यादा?
सायकलिंग हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच. हल्ली ज्यात त्यात आवाहन करण्याची स्टाइल आहे त्यामुळे- तुम्हीही सायकलिंग करा. बघा. खरंच आनंद होईल खूप.अ आ आई- म म मका तसं माझ्यासाठी स सा सायकल आहे. हे काय अद्वैत आहे माझं सायकलीशी कोण जाणे. पण सायकल फार आपली वाटते मला. साधारण आठव्या वर्षी शिकले मी सायकल. आधी बरेच कम्पल्सरी हॉपिंग करावं लागलं.
तंद्री लागली होती माझी. कुंडीतली रोपं.. रस्त्यावरची झाडं.. त्यातून झिरपणारा प्रकाश.. सूर मारून आलेले दोन पोपट.. बराच वेळ रुंजी घालणारं एक निळं फुलपाखरू.. काय काय दिसत होतं.. खांदे सैल झाल्यासारखे वाटत होते. पाठ टेकून निवांत बसले होते मी. अर्धा-पाऊण तास झाला आणि माझं घडय़ाळाकडे लक्ष गेलं.
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का. तुझ्या परि गूढ सोपे कोणी, मला मिळेल का. सौमित्र
जुन्या मराठी सिनेमात, हीरोच्या शर्टाचं बटण लावणे, दोरा दातांनी तोडणे. हे पराकोटीचं रोमॅण्टिक वाटायचं. असे सीनसुद्धा आता हद्दपार होत चालले आहेत नाही. तीन-चार छोटी छोटी कामं निघाली म्हणून सुई-दोऱ्याचा डबा काढला. एक बटण, दोन टिपा आणि एक काज दुरुस्त करायला अवघी दहा-बारा मिनिटं लागली.
या चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..
कर्मेद्रचं पत्र अर्ध वाचून झालं तोच सेवाराम रिकामा ग्लास न्यायला आल्यानं थोडा व्यत्यय आला खरा.
ज्ञानेंद्र आणि योगेंद्र या दोघांचा मजकूर वाचून झाल्यावर डॉक्टर नरेंद्र अंमळ थांबले.
डॉक्टर नरेंद्र यांनी उत्सुकतेनं लिफाफा फोडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली.
ब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.
बुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..
समुद्रकिनारी फेरफटका मारून आणि मग न्याहरी करून सर्व जण दिवाणखान्यात स्थिरस्थावर झाले होते.
अभंगाच्या चर्चेची अखेर जवळ आल्याच्या जाणिवेनं का कोण जाणे, हृदयेंद्र थोडा हळवा झाला..
माजघर या शब्दाचा अर्थ घराचा मध्यभाग.. तिथं अगदी मोजक्या लोकांना प्रवेश असतो..
मग हृदयेंद्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ‘साधक’ तर झालो, पण खरी साधना होत नाही..
हृदयेंद्र - निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत
एकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते.
सद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.
मुळात मन मावळणं, म्हणजे नेमकं काय, हे समजून घ्या! जन्मापासून हे मन देहबुद्धीनं व्यापलेलं आहे.
‘मन गेले ध्यानी’बद्दल बोलता बोलता एकनाथ महाराजांचा हा अभंग का आला?
अज्ञानाची पट्टी बांधूनच तर आपण जगत आहोत, ती पट्टी काढून खऱ्या दृष्टीनं पाहू लागलं पाहिजे
प्रभू रामचंद्रच त्यांचे सद्गुरू होते आणि रामाशिवाय त्यांच्या अंत:करणाला दुसरा काहीच विषय नव्हता.
भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले
इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.
ह्या पक्ष्याची नोंद करून त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली आहेत.
पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीने ग्रामस्थांचे स्थलांतर
कोल्हापूरात शाहूप्रेमी नागरिक, राजकीय पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला.
इचलकरंजी शहरांमध्ये वाइन शॉप चालकांनी दुकानासमोर बॅरिकेड लावून सामाजिक अंतर ठेवत विक्री सुरू केली
करोनामुक्त झालेल्या या बालकाला आज टाळ्या वाजवत, फुलांचा वर्षाव करीत डिस्चार्ज देण्यात आला.
कोल्हापुरातील करवीर पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्यावतीने मंगळवारी तक्रार करण्यात आली.
करोनाच्या संकटामुळं महिन्याभरावर आलेल्या या सोहळ्याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.